Breaking News

सांघिक खेळातून ऐक्य भावना वाढीस लागते : श्‍वेता महालेचिखली,(प्रतिनिधी): खेळांमधून शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त होते आणि सांघिक खेळांमधून ऐक्य भावना वाढीस लागते, याच भावनेतून सामुहिक प्रयत्न केल्यास समाजाचा व देशाचा विकास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी व्यक्त केली. 5 डिसेंबर रोजी सीएम चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण करतांना त्या बोलत होत्या. भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिखली विधानसभा मतदार संघातील सीएम चषक महोत्सवाचा शुभारंभ 3 डिसेंबर रोजी झाला. या अंतर्गत आयोजित कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण श्‍वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते पार पडले.

 चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. मतदारसंघातील 75 कबड्डी संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. उत्कृष्ट खेळ सादर करुन खेळाडूंनी प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी बद्दल 25, 000 रूपयांचे बक्षीस धानोरी येथील चक्रधर कबड्डी संघाने जिंकले तर अनुक्रमे 15, 000 व 11, 000 रूपयांचे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक धोत्रा नाईकच्या संघाने व मंगरुळ नवघरे येथील माऊली कबड्डी संघाला मिळाले. पुरस्कारप्राप्त संघाचे श्‍वेताताई महाले यांनी अभिनंदन केले.  भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सीएम चषक स्पर्धांचे जिल्हा सहसंयोजक गोपाल देव्हडे, चिखली विधानसभा संयोजक कैलास सपकाळ, सहसंयोजक पंजाबराव धनवे, प्रसिद्धी प्रमुख विजय वाळेकर व नोंदणी प्रमुख आकाश चुनावाले, शिवराज पाटील, विक्की हरपाळे, कल्याणी माळोदे, रूपेश जगताप, चेतन पाटील, मनीष गोंधणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.

 तालुका क्रीडा संकुलाच्या आवारात पार पडलेल्या या स्पर्धेच्या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, मा श्री प्रेमराजजी भाला सचिव शिक्षण प्रसारक मंडळ, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, शहर सरचिटणीस भानुदास कुटे, तालुका सरचिटणीस बबनराव राऊत, आरोग्य सभापती विजय नकवाल, नगरसेवक नामू गुरुदासाणी, नगरसेवक गोविंद देव्हडे, प्रा.डॉ.राजु गवई, सुदर्शन खरात, शेख अनिसभाई, दिलीप डागा, गोविंद गिनोडे, डिगांबर शेटे, अंकुशराव पाटील, नाना खेडेकर, उत्तमराव गोगे,प्रा विरेंद्र वानखेडे, , संतोष अग्रवाल, भारत दानवे, अक्षय भालेराव, मनीष गोंधणे, दर्शन शर्मा, आयुष कोठारी, योगेश झगडे, विक्की शिनगारे, बलदेवसिंग सपकाळ, शंकर तायडे, संतोष काळे पाटिल, अनमोल ढोरे पाटील, आदि पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.