Breaking News

पोलीस पाटील संघटनेकडून थ्रि-सीटर भेट

सोनइ/प्रतिनिधी
पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जमा केलेल्या निधीतून एक वैभव प्राप्त वस्तू सोनई पोलीस ठाण्यास नुकतेच थ्री सीटर चेअर स.पो.नि.कैलास देशमाने यांच्याकडे भेट म्हणून सुपूर्त करण्यात आले. सध्या जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यात अद्यावत सुविधा उपलब्ध करून तात्काळ कारवाईचे व स्मार्ट पोलीस ठाणे म्हणून काम हाती घेऊन या संकल्पनेतून जनहितार्थ जनतेने आर्थिक सेवा म्हणून नागरिकांनी एक मदतीचा हात पुढे केला आहे. त्या अनुषंगाने सोनई परिसर पोलीस पाटील संघटनेने 12000/ - रु किमतीचे थ्री-सीटर बसण्यासाठी स्टील कोटिंग असलेले चेअर भेट देऊन एक उत्तम कामगिरी केली आहे. सध्या या पोलीस ठाण्याची वाटचाल स्मार्ट ठाणे म्हणून जिल्ह्यात प्रथमच भव्य दिव्य होत आहे.