Breaking News

आष्टी न.पं.अंतर्गत ९०४ घरकुल मंजूर -नगराध्यक्षा संगिता विटकर


आष्टी,(प्रतिनिधी):प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ९०४ लाभार्थ्यांना नगर पंचाायतकडून करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा श्रीमती संगिता विटकर यांनी दिली.आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शहरातून १ हजार १४८ अर्ज नगरपंचायतकडे प्राप्त झाले होते.त्यापैकी ९०४ लाभार्थ्यांचे घरकुल या योजनेत  पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आले आहेत.या पहिल्या टप्प्यातील घरकुलाचे काम लवकरच सुरु होईल असेही विटकर यांनी स्पष्ट केले आहे.घरकुल बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये मिळणार आहे. ही रक्कम तीन टप्प्यात मिळणार तर परवानगीसाठी स्वतंत्र पथक ,प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम परवानगी देण्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना केली आहे.या योजनेअंतर्गत स्वत:च्या जागेवर बांधकाम करण्यासाठी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानगीसाठी प्रभाग निहाय पथकाची नियुक्ती केली आहे.