Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अंधारातला दीपस्तंभ : राजेश काकडे किनगांव राजा,(प्रतिनिधी): किनगांव राजा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेश काकडे प्रमुख पाहुणे तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर मांटे, उपसरपंच कैलास झोरे, रामेश्‍वर काकड, प्रमोद काकड, गणेश काकड, दिपक साळवे  हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेश काकडे यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अंधारातला दीपस्तंभ होते. महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे भूषण, नवभारताची घटना बनविणारे ते कायदे पंडित होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन दलित श्रमिक शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला असे सांगितले. तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर मांटे यांनी सांगितले की, आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली वाहायची असेल तर त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून त्यांचे विचार अंगिकरुन ते आचरणात आणणे ही काळाची गरज आहे.

 यावेळी उपसरपंच कैलास झोरे यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हालअपेष्ठा सहन करुन बहुजनांचे जीवन प्रगती पथावर नेले. आजचे बहुजन समाजाचे उंचावलेले जीवनमान म्हणजे बाबासाहेबांची देणगी आहे. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर मांटे, उपसरपंच कैलास झोरे, दिपक साळवे, रामेश्‍वर काकड, प्रमोद काकड, गणेश काकड, पत्रकार भगवान नागरे, सखाराम हरकळ, रमेश काकड, राधाकिसन जाधव, भगवान झोरे, दिनेश पारखे, स्वप्निल वल्टे, गणेश डोळे, गौतम खाडे, शैलेश साळवे, शेख गुलाब, अफरोज शेख, विजयसिंग राजे जाधव, विष्णू हुशे, विशाल राजे जाधव, प्रसाद कुलकर्णी, गजानन नागरे, आशिष राजोते, महेश घिके, पांडुरंग झोरे, अमोल साळवे, सुनील झोरे, फिरोज शेख, विलास झोरे, इसाक कुरेशी, अफरोज पठाण, आनंद राजे जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, सुनिल जाधव, गजानन काळुसे यांच्यासह अनेक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.