शहीद जवान सुभाष नागरगोजे यांचे स्मारक


बीड, (प्रतिनिधी)- बीड जिल्हा महसुल अधिकारी, कर्मचारी व शहीद स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने शहीद जवान कॉ. सुभाष रंगनाथ नागरगोजे ( उखडऋ) बनकरंजा ता. केज जि.बीड  यांच्या स्मरणार्थ शहीद स्मारकाचे अनावरण मा. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या हस्ते बनकरंजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रागंणात झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी डेप्युटी कमांडर ( उखडऋ), औरंगाबाद  ए.मन्ना, मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे,  अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, तहसिलदार संजय वारकड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भगवान सोनवणे, वीरपत्नी सुनिता सुभाष नागरगोजे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले की, २५ वर्षानंतरी शहीद जवान कॉ. सुभाष नागरगोजे यांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात कायम असुन त्यांचे स्मारक जिल्हयातील नागरिक व पुढील पिढींसाठी प्रेरणास्थळ ठरणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
शहीद जवान कॉ. सुभाष नागरगोजे यांचा जन्म १ जुन १९७१ रोजी  झाला असुन ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ( उखडऋ ) २६ ऑक्टोबर १९९१ रोजी सेवेत कार्यरत झाले होते. त्यांची सेवा सुरु असतांना कोळसा तस्करांच्या चकमकीत पश्चिम बंगालमधील शितलपुर येथे १५ स्पटेंबर १९९४ रोजी देशसेवा करत असतांना शहीद झाले. कोळसा तस्करांच्या चकमकीत पश्चिम बंगालमधील शितलपुर येथे देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या २२ हुताम्यासाठी त्यांचे स्मारक त्यांचे शिक्षण झालेल्या शाळेमध्ये उभारावे अशा निर्देश पंतप्रधान महोदययांनी दिले होते. त्यानुसार  शहीद जवान कॉ. सुभाष नागरगोजे यांचे स्मारक  जिल्हा परिषद शाळा, बनकरंजा  येथे उभारण्यासाठी सर्व महसुल अधिकारी-कर्मचारी  यांनी  एक दिवसाच्या वेतनातून ६ लाख १४ हजाराचा निधी देवून एक वेगळा आदर्श निर्माण केला असून या निधीतून हे स्मारक उभारण्यात आले आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शहीद जवान कॉ. सुभाष रंगनाथ नागरगोजे ( उखडऋ)  यांनी कोळसा तस्करांच्या चकमकीत आपले कर्तव्य बजावुन देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली असुन त्याचा आपणास विसर नपडता त्यांच्या उभारण्यात आलेल्या स्मारकातून प्रेरणा घेवून देशसेवेसाठी कार्य करावे. देशसेवा करण्याचे सर्वात मोठे योगदान जवान करत असतात म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात भरती होण्याचे आवाहन डेप्युटी कमांडर ( उखडऋ), औरंगाबाद  ए.मन्ना, यांनी यावेळी केले. तसेच या स्मारकासाठी  जिल्हातील महसुल अधिकारी-कर्मचारी यांनी निधी दिल्यामुळे त्यांचे आभार मानुन उखडऋ च्या वतीने  जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना सन्मानित केले. यावेळी उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, याचेही समोचित भाषणे झाली. सुत्रसंचलन अंगद राख यांनी केले तर आभार तहसिलदार संजय वारकड यांनी मानले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते फित कापुन स्मारकाचे अनावरण करुन पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी अधिकारी -कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, शाळेतील विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget