Breaking News

खुन प्रकरणातील आरोपी २४ तासात गजाआडपरळी, (प्रतिनिधी):- येथील शेख मकदुम कलंदर या तरूणाच्या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासामध्ये ग्रामीण पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.

परळी येथील शेख मकदुम कलंदर या तरूणाची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. याप्रकरणात मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शेख समीर शेख वल्ली याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील आरोपी शेख समीर हा बरकतनगर येथील त्याच्या घराजवळ आल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेवून शेख समीर यास गजाआड केले.