Breaking News

विमानतळ प्राधिकरणाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा.


मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील विमानतळ प्राधिकरण कार्यालयावर नुकताच सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. येथील बामणवाडा हिल ते विलेपार्ले स्टेशनकडे जाणारी ८० वर्षे जुनी वहिवाट विमानतळ प्राधिकरणाने बंद केली. यामुळे येथील स्थानिक नागरिक, विद्यार्थी यांना नाहक प्रवासाचा त्रास होत असून वेळेवर शाळा आणि कार्यालयांमध्ये जाणे मुश्कील झाले आहे.

त्यामुळे विमानतळ प्राधिकरण कार्यालयाच्या या मनमानी आणि मुजोरीच्या निषेधार्थ बामणवाडा ते विमानतळ प्राधिकरण कार्यालयापर्यंत मंगळवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. याला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. या मोर्चाला भाजपा स्थानिक आ. ॲड. पराग अळवणी, शिवसेना उपविभागप्रमुख सुभाष सावंत, माजी नगरसेवक शशिकांत पाटकर, काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका विनी डिसुझा, शिवसेना शाखाप्रमुख नरेश सावंत, मनसेचे संदीप दळवी, काँग्रेसचे बाळा सरोदे व इतर मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने विमानतळ प्राधिकरण प्रशासनाबरोबर सविस्तर चर्चा केली असून यातून काहीतरी मार्ग निघेल, अशी आशा येथील नागरिकांनी व्यक्त केली..