Breaking News

सरकारने शेतकर्‍यांना झुलवत ठेवले


नगर । प्रतिनिधी -
ज्येष्ठेनेते शरद पवार यांनी शेतकर्‍यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम केले. मात्र भाजप सरकारने महाराष्ट्राचे जनजीवन उध्वस्त करण्याचे काम केले. लाखो तरुणांना बेरोजगार केले. कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकर्‍यांच्या हिताचे प्रश्न मांडले. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभावसाठी प्रयत्न केले. कर्जमाफीसाठी सर्वात मोठे पाऊल पवार यांनी उचलले होते. शेतकर्‍यांना दुष्काळात खरीप-रब्बी पिकांचे विमे वेळोवेळी देण्याचे काम केले. मात्र, या सरकारने शेतकर्‍यांना झुलवत ठेवण्याचे काम केले, अशी टीका नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा दरेकर यांनी केली. 

शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा दरेकर यांच्या नेतृत्वखाली नगर तालुक्यातील बारा गावांमध्ये राष्ट्रवादीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी जि.प.सदस्य माधवराव लामखडे, सुजीत झावरे, कुमार वाकळे, वसंत ठोकळ, दादा झरेकर, राधाकृष्ण वाळूंज आदी उपस्थित होते. चास, कामरगाव, सारोळा, बाबुर्डी बेंद, हिवरेझरे, राळेगण म्हसोबा, गुंडेगाव, खडकी, देऊळगाव सिद्धी, घोसपुरी या गावांमध्ये नव्याने शाखा उघडण्यात आल्या आहेत. दरेकर पुढे म्हणाले, वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता पक्ष वाढीसाठी व शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. भाजप सरकारने महाराष्ट्रातील नागरीकांना आश्वासने देऊन फसवले. शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी वार्‍यावर सोडले. शेतकर्‍यांच्या कुठल्याच शेतीमालाला हमी भाव दिला नाही. पवार यांनी 72 हजार कोटींची कर्जमाफी देवून शेतकर्‍यांचे हित जोपासले.
यावेळी अध्यक्ष अंकुश काळे, उपाध्यक्ष विजय लांडगे, खजिनदार अक्षय गावकरी, सचिव संकेत रासकर, सुभाष रासकर, बापू पवार, सचिन भास्कर, नितीन केदारी, विजय कारले, ऋषी लांडगे, शरद कारले, अक्षय देवकर, सोमा कारले, गोरख बोरगाव, सचिन खरे, विजय गुंजाळ, हेमंत कारले, बाळासाहेब कारले, संजय गुंजाळ, देवकर कार्यकर्ते उपस्थित होते.