Breaking News

केंद्र सरकारकडे दुष्काळ परिस्थितीचा परिपुर्ण आराखडा सादर -- राम शिंदे


पाथर्डी/प्रतिनिधी
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे जो दुष्काळ परिस्थितीचा परिपूर्ण आराखडा दिला आहे. त्यावर निश्‍चित स्वरूपामध्ये लवकरच अनुदान प्राप्त होईल. दुष्काळातील उपाययोजना पूर्ण करण्यासाठी केंद्राच्या अनुदानाची वाट न पाहता आताच्या बजेट मध्ये तरतूद केली असून शेतकर्‍याच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलेली आहेत. त्याला केंद्र सरकारने सुद्धा पाठींबा दिला असून येणार्‍या अडचणीच्या काळात राज्य सरकार व केंद्र सरकार मिळुन या सर्वतोपरी प्रयत्न करत दुष्काळावर मात करेल असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.
  राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रशासनाचे नेमणूक केलेले पथक बुधवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे दाखल होऊन ठरलेल्या दौर्‍याप्रमधील पत्र्याच्या तांडा हे गाव वगळून शिरसाठ, रांजणी, केळवंडी या गावाची पथकाने पाहणी केली. यावेळी आ. मोनिका राजळे,जि.प.सदस्य राहुल राजळे, नगरपालिका नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत सभापती व उपसभापती, पंचायत समिती सदस्य, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री राम शिंदे यांनी म्हटले की, अहमदनगर दक्षिणचा भाग दुष्काळाला समोरे जाताना असताना शेतकर्‍याचा फळबागाचा प्रश्‍न आहे. त्या कशा वाचवायच्या त्यांच्या अनुदानाचा प्रश्‍न आहे. दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे शहरातील नगरपालिका हद्दीतील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत निवेदन दिले. परंतु ते निवेदन दिल्यानंतर त्या नगरसेवकांची राम शिंदे यांनी खिल्ली उडवली. या आशयाचे लिखाण व एक व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुप वरती व्हायरल झाल्याने तो पाथर्डीत चर्चेचा विषय ठरत आहे.