Breaking News

काळचौंडीत विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू


म्हसवड प्रतिनिधी : काळचौंडी (ता. माण) येथे सौ. आशा किसन खरात (वय 30) या महिलेचा विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी घडली.

मृत महिलेचा पती किसन सर्जेराव खरात यांनी म्हसवड पोलिसात याबाबतची फिर्याद दिली असून अधिक माहिती अशी, आशा किसन खरात ही विवाहिता गुरुवार दिनांक 29 रोजी सकाळी सहाच्या सुमारास शौचास जाते, असे सांगून घरातून बाहेर गेली. ती बराचवेळ झाला तरी घरी परतली नाही. त्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू केली असता काल सायंकाळी प्रभाकर माने यांच्या विहिरीत त्यांच्या चपला तरंगत असल्याचे आढळून आल्याने पाण्यात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण विहिरीत पाणी जास्त असल्याने व अंधार पडू लागल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता दुपारी एकच्या सुमारास आशा खरात यांचा मृतदेह हाती लागला. याप्रकरणी हवालदार कांबळे अधिक तपास करीत आहेत.