Breaking News

मराठा आरक्षण समर्थनार्थ शेळके व निकम यांच्या हस्तक्षेप अर्जावर दहा डिसेंबरला सुनावणी


येवला  प्रतिनिधी - येवले तालुक्यातील पांडुरंग धोंडिबा शेळके व प्रवीण अंकुशराव निकम या मराठा युवकांनी मराठा अरक्षणाविरुद्ध ना उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल असलेल्या जनहित याचिकेत आपला हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील हे दोघेच आहे या हस्तक्षेप अर्जात ज्यात उच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे की सदरची जनहित याचिका ही मराठा आरक्षणाच्या विरोधात केली असून त्या याचिकेत कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून मराठा आरक्षण कसे योग्य आहे व ते कसे व कोणत्या पद्धतीने कायदेशीर आहे हे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. सदरची जनहित याचिका यात कोणताही निर्णय देण्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने आधी आमची बाजू ऐकून घेऊन आम्हाला या जनहित याचिकेत सामील करून घ्यावे व या याचिकेला विरोध करण्याची संधी देण्यात यावी. सदर जनहित याचिकेची सुनावणी सोमवार दि दहा डिसेंबर 2018 रोजी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश  व न्यामुर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाचे समोर 14 नंबर ला ठेवण्यात आली आहे. नाशिकच्या याचिका कर्ते यांची बाजू मुंबई येथील विधिज्ञ ऍड. वैभव डी. कदम व ऍड. संजीवकुमार देवरे हे पाहत आहेत.

*मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे परंतु काही लोक कायद्याचा आधार घेऊन निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी काम करीत आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळणारच हे त्रिकाल बाद सत्य आहे त्यासाठी न्यायालइन लढाई लढण्यास कुठल्याही परिस्थितीत तयार आहे.*

*पांडुरंग शेळके पाटील येवला.*