Breaking News

शेवगाव येथे जागतिक अपंग दिन साजरा


दि. 3 डिसेंबर रोजी  शेवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मराठी मुले येथे पंचायत समिती शिक्षण विभाग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांना राऊड यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व गोड फराळाचे वाटप करण्यात आले, सदरील कार्यक्रमाला शैलजा राऊड यांनी एकही मूल शिक्षणापासून वंचित राहायला नको अशा प्रकारचे नियोजन केले. सदरील कार्यक्रमाला  रमेश गोरे, माऊली बोडखे तसेच प्रकाश लबडे, रावसाहेब बोडके, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव मराठी मुलांचे सर्व शिक्षक व गट साधन केंद्राचे सर्व विषय तज्ञ विशेष तज्ञ, सर्व विशेष शिक्षक हजर होते कार्यक्रमाचे प्रस्तावित समावेशित शिक्षण तज्ञ सुनील बावचे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तात्रय सुरवसे यांनी केले.