Breaking News

देसाई कारखान्यावर अभिवादन


पाटण : आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दौलतनगर, (ता. पाटण) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, माजी सदस्य बशीर खोंदू, जालंदर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार, यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, तसेच मरळी, चोपदारवाडी गावातील कार्यकर्ते, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.