Breaking News

संविधानामुळे देशाची एकात्मता टिकुन आहे : प्रा. खिल्लारे
चिखली,(प्रतिनिधी): विविधतेने नटलेल्या या देशात सामाजिक, एकात्मता व बंधुभाव आणी आप आपसातील सौदाहार्याचे  वातावरणाला जेव्हा केव्हा आव्हाण देण्याचा प्रयत्न विघटनवादी शक्तीकडुन होतो, त्या त्या वेळेस त्या अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी संविधानाचा आधार घेतल्या जातो. असे हे भारतीय एकात्मता टिकविणारे संविधान ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिले असे प्रतिपादन प्रा. खिल्लारे यांनी केले. चिखली तालुका काँगे्रस कमिटीच्या वतीने 6 डिसेंबर रोजी  जिल्हा उपाध्यक्ष समाधान सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.  यावेळी प्रा. खिल्लारे  यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान या विषयावर मार्गदर्शन केले. तर जिल्हा कॉगे्रस सहकार सेलचे अध्यक्ष दिपक देशमाने, प्रदिप पचेरवाल, सरदार, नगरसेवक सुनिल कासारे यांनी बाबासाहेबांच्या जिवनावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिलींद भंडारे यांनी केले.

 या कार्यक्रमासाठी तालुका काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ. मोहमंद इसरार, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्‍वर सुरूशे, नगरसेवक दिपक थोरात, गोकूळ शिंगणे, अ‍ॅड प्रशांत देशमुख, मकरंद भटकर, बाळु भिसे, मनिष मोरे, लक्ष्मण भिसे, संजय पवार, एम.व्ही. आराख, पंजाबराव पवार, लक्ष्मण वानखेडे, रघुनाथ खरात, सागर खरात, ब्रम्हानंद नवघरे, गजानन पैठणकर, सदानंद आराख, गुलाबराव वानखेडे, रवि सोनुने, पुरूषोत्तम शिराळे, कैलास इचे, दादाराव सोनटक्के, एम.के.सरदार, श्रीकांत पवार, मिलींद भंडारे, गुलाब पवार, व गोैतम पवार यांच्यासह असंख्य कार्यकत्र्यांची उपस्थिती होती.