Breaking News

परळीत तरूणाची गळा चिरून हत्यापरळी, (प्रतिनिधी) :- शहरातील बरकतनगर येथील शेख मगदुम कलदंर या तरुण युवकाचा सपासप वार करून गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना शहरापासून जवळच असलेल्या तालुक्यातील नंदागौळ शिवारामध्ये सोमवारी (ता.०३) रात्री ९.३० सुमारास ही घटना घडली.

या बाबत अधिक माहिती अशी की बरकतनगर भागात राहणारा शेख मकदुम कलदंर हा युवक आपल्या सहा मित्रा सोबत काल सायंकाळी जेवणाच्या पार्टीसाठी गेला होता. पार्टी झाल्यावर त्या चौघापैकी दोन मित्र रात्री ८ वाजता घरी परत आले. शेख मकदुम कलदंर व त्याचा दुसरा मित्र मागे राहिले रात्री ९.३० च्या दरम्यान नंदागौळ पासुन १ कि.मी.च्या अंतरावरील पुस जवळ एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती ग्रामिण पोलिसांना मिळाली.पोलीसांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली असता सदर युवकाच्या शरिराच्या भागावर तर पाठीमागे ४ ठिकाणी घातक हत्याराचे वार आढळून आले.

 त्याचबरोबर गळा चिरलेला दिसून आल्याने हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. शेख मकदुम कलंदर (वय २८, रा.बरकत नगर, परळी) असे मयताचे नाव समोर आले. याप्रकरणी मयताचा भाऊ शेख मुस्ताफा शेख कलंदर याच्या फिर्यादीवरून शेख समीर शेख वल्ली (रा.बरकत नगर, परळी) याच्याविरूध्द कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नसून पुढील तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय मारूती शेळके हे करीत आहेत. दरम्यान आरोपीने तु माझ्याघरात दखल का देतोस असे म्हणून शेख मकदुम याची हत्या केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आली.