Breaking News

संसर्गजन्य गोवर व रुबेला समूळ नष्ट करूया- घुले

                           
 शेवगाव/प्रतिनिधी  
 गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते. वयाच्या 9 महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस 9 महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते. 10.11 वर्षानंतर आणखी एकदा लस देण्याचा सल्ला दिला जातो. विद्यालयाच्या परिसरात गोवराची साथ पुरेसे लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये आल्याची उदाहरणे आहेत. त्यासाठी संसर्गजन्य गोवर व रुबेला समूळ नष्ट करूया. या विद्यालयाने लसीकरणासाठी केलेले नियोजन हे संपूर्ण जिल्हा व राज्यासाठी पथदर्शक असल्याचे सांगितले व विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक स्टाफ हे अभिनंदनास पात्र आहेत. असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती क्षितीज घुले पाटील यांनी केले. ते आरोग्य विभाग पंचायत समिती, रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स शेवगाव, रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोवर व रुबेला लसीकरण उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बाळास गोवर होण्याची शक्यता असते गोवर. गालगुंड आणि रुबेला अशा तीनही लसी एकत्र दिल्या जातात. लस दिल्याने ऑटिझम आत्ममग्नताद्ध असलेले स्वमग्नद्ध बालक होते. अशी समजूत आहे मात्र जागतिक आरोग्य निधी या संघटनेने एमएमआर लसीमुळे स्वमग्न बालक होण्याची शक्यता फेटाळली आहे. डब्लिनमध्ये गोवराची लस न दिलेल्या बालकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे सर्व विकसनशील देशातील बालकांना एमएमआर लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आराखड्यानुसार 2015 सालापर्यंत गोवराने होणार्‍या मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी करण्याचा संकल्प केला गेला आहे. मी स्वतः गेल्या 20 वर्षांपासून ही लस देत आहे. त्यामुळे लसीकरणाबद्दल गैरसमज नको असे मत बालरोग तज्ञ डॉ.विकास फलके यांनी व्यक्त केले. या वेळी बापूसाहेब भोसले, चंद्रकांत परदेशी, डॉ.दीपक परदेशी, डॉ.विजय फलके, आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिराणी, डॉ.संजय लड्डा, डॉ.दिनेश राठी, गट शिक्षण अधिकारी शैलजा राऊळ,  सतीश  लांडे, फुलचंद रोकडे, मनीष बाहेती, भागनाथ काटे, सुरेश पाटेकर, विकास नन्नवरे, अजय नजन, संतोष जाधव, तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका तसेच विद्यालयाच्या झुंबरबाई पाटेकर,  बाबासाहेब मोटे, मच्छिंद्र गोसावी सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गव्हाळ यांनी तर आभार प्रदर्शन रामनाथ काळे यांनी केले.