Breaking News

बीड बसस्थांनका समोर वेड्यांचा राडाबीड (प्रतिनिधी)- बीड बसस्थांनक परिसरात वेड्यांची संघ्या वाढली असुन चित्र-विचित्र कपड्यात हातात दगड, काठ्या घेवून फिरणारे वेडे येणार्‍या-जाणार्‍या नागरीक, व्यापारी, प्रवाशी यांच्या हल्ला करत असुन दगड मारणे, अंगावर धावणे, शिव्या देणे हे नित्याचेच झाले आहे. हे मनोरूग्ण कुठून आले कधी आले याबाबत कोणालाच माहिती उपलब्ध नाही मात्र दिवस भर स्थानक परिसरात फिरून संध्याकाळी बसस्थांनकात वास्तव्य करतात दररोज यांच्यामुळे सामन्यान त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात हॉट्ेल, बेकरी, लॉजिग असल्याने येथे नेहमिच वर्दळ असते यामुळे मोठी घटना या मनोरुग्णांकडुन घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील व्यापारीसह नागरीकांनी केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी बसस्थांनका परिसरात राज्या बाहेरील तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यायामधुन मोठ्या संख्येने वेडे डेरे दाखल झाले आहेत. दिवसभर शहरात फिरुन पोटाची खळगी भरतात व संध्याकाळी बसस्थांकात झोपतात मागील अनेक महिन्यापासुन हे सत्र सुरू असुन अधुन-मधुन हे वेडे अक्रमक होतात, परिसरातील हॉटेलमध्ये येणार्‍या नागरीकांनवर दगडांने प्रहार करताता. अनेक वेळा घाण शिव्या देतात वेडे असल्याने यांच्याकडे नागरीक, व्यापारी दुर्लक्ष करतात, परंतु यांची हिम्मंत वाढली असुन एखाद्यावेळेस मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेड्यांवर उपचार होणे अवश्यक असुन औरंगाबाद किवा पुणे येथे वेड्यांचा रुग्णालयात यांना दाखल करण्याची मागणी नागरीकां मधुन होत आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासकीय स्तरावर कोणतीही उपाय योजना करण्यात येते नाही, शहरातील विविध सामाजीक संघटनांचे या प्रश्‍नाकडे दुलर्क्ष होत असल्याचे दिसत आहे. वेळीच या गंभीर बाबीकडे लक्ष न दिल्यास एखादी मोठी घटना या वेड्यांकडुन होण्याची शक्यता नाकारता येत नाही