Breaking News

पोलीस मुख्यालयात होमगार्डचा मृत्यू


नगर । प्रतिनिधी - महानगरपालिकेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डचा येथील पोलीस मुख्यालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही.

सतीश सुभाष जगताप (वय.39, रा.जामखेड) असे मयत होमगार्डचे नाव आहे. जगताप हे जामखेड पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होते. बाहेरून आलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या निवासाची पोलीस मुख्यालयात व्यवस्था करण्यात आलेली आहे. रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. ही बाब जगताप यांच्या सहकार्‍यांच्या पहाटे लक्षात आली. जगताप यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. शवविच्छेदनासाठी जगताप यांचा मृत्यूदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.जगताप यांच्या पाठीमागे आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.