क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहून नेणारा ट्रक पलटी


संगमनेर/प्रतिनिधी
क्षमतेपेक्षा जास्त ऊस लादून नेणारा ट्रक शहराच्या तीन बत्ती चौकात पलटी होऊन उसाबरोबर मालगाडीचे सांगाडे देखील रस्त्यावर विखुरल्याचे चित्र दि. 14 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बघायला मिळाले. एमएच 12 एक्यू 206 असा ऊस वाहतूक करणार्‍या गाडीचा क्रमांक आहे. तालुक्यासह आसपासच्या गावांतील ऊस मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांना पोहचविण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक यांच्या माध्यमातून उसाची वाहतूक केली जाते. परंतु बर्‍याचद क्षमतेपेक्षा जास्त ऊस गाडीत लादतात. त्याचा परिणाम, शहरातील रस्त्यांवरून वाहतूक करत असताना खड्ड्यांतून किंवा गतिरोधकावरून गाडी गेल्यावर ती पलटी होण्याचे वा ट्रकचा सांगाडा तुटून अपघात होण्याचे प्रकार बघायला मिळतात. अतिक्षमतेने भरलेली ही वाहने अतिशय जुनी व बिघाडलेल्या अवस्थेत असतात. वाहतूक पोलीस विभागाने अशा वाहनांवर कारवाई करणे गरजेचे असताना पोलीस मात्र याबाबत निष्क्रिय असल्याचे आढळून आले आहे. आज झालेल्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु अशा पद्धतीने उसाचे ट्रक शहरातून बिनधास्तपणे असेच चालू राहिले, तर भविष्यात एखाद्या दुर्घटनेत जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget