Breaking News

भाजयुमोच्या माण तालुका अध्यक्षपदी ब्रम्हदेव काटकर


म्हसवड (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चाच्या माण तालुका कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी ब्रह्रादेव काटकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.  भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीलेश नलावडे व माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माण तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी वडजल (ता. माण) येथील ब्रम्हदेव हिंदुराव काटकर यांची माण तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, शिवाजीराव शिंदे, संजय पवार, नानासाहेब साळुंखे, सी. एम. पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

माण तालुक्यात युवकांचे सक्षम संघटन उभारून भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे व सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत तसेच माण तालुक्यात युवक पदाधिकार्‍यांच्या संपूर्ण नियुक्त्या करून युवक कार्यकारणी कार्यरत करावी तसेच माण तालुक्याच्या नियमित बैठका आयोजित करून युवकांची मजबूत फळी उभी करण्याच्या सूचना डॉ. येळगावकर यांनी या वेळी दिल्या. 

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना काटकर म्हणाले, माझ्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार असून तालुक्यात गाव तिथे युवा मोर्चाची शाखा उघडून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचवणार असून तालुक्यात कमळ फुलवण्यासाठी युवकवर्गाला बरोबर घेऊन काम करणार आहे.