मंत्रालयात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या मुलाचा आत्महत्येचा इशारा


धुळे (प्रतिनिधी) मंत्रालयात विष पिवून आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या मुलानेही आता आत्महत्येचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर आत्महत्या करू, असा इशारा धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. या संदर्भात नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल केला आहे.


धर्मा पाटील यांच्या आत्महत्येला वर्ष होते आहे. याप्रकरणी अजूनही दोषींवर कारवाई झालेली नाही. दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन देणारे आणि या प्रकरणात मध्यस्थी करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अपयशी ठरले आहेत. या सगळ्यांनी या प्रकरणाचा जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे पद सोडाव,े असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. मागणीकडे त्वरित लक्ष देऊन कारवाई न झाल्यास माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मी आत्महत्या केली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल असेही नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. 

धुळे जिल्ह्यातील विखरण या गावात राहणार्‍या धर्मा पाटील यांनी वीज प्रकल्पासाठी गेलेल्या शेत जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्याने मंत्रालयात 22 जानेवारी 2018 रोजी विष प्यायले होते. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान 28 जानेवारी 2018 ला त्यांचे निधन झाले. आता त्यांच्या मुलानेही आत्महत्येचा इशारा दिला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget