Breaking News

शिर्डीत साई दर्शनासाठी आलेल्या जवानाने केला हवेत गोळीबार



शिर्डी/प्रतिनिधी
शिर्डीत साई दर्शनासाठी आलेल्या जवानाने शहरातील एका हॉटेलमध्ये रात्री बाराच्या आनंदाच्या भरात हवेत गोळीबार केला आहे, असा दावा त्या जवानांनेच केला असला तरी शिर्डीसह परिसरात एकच खळबळ उडाली असली. हे हॉटेल साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे तात्काळ संस्थान प्रशासनाने खबरदारी घेत सुरक्षेत वाढ केली होती.

शिर्डी शहरातील पालखी रस्त्यावर स्थित असणारे हॉटेल कौशल्या येथे मध्यप्रदेश राज्यातील रेवा जिल्ह्यातील पुष्पराज रामप्रसाद सिंग यांनी एक खोली भाडोत्री घेतली होती. तो जवान सुमारे वय 38 वर्षीय आहे. तो आपल्या काही मित्र व भावासोबत मध्यरात्रीत शिर्डीला आला होता.

त्यांनी पालखी रोड येथे हॉटेल येथे रूम घेतली, यावेळी मध्यरात्री एकच्या सुमारास त्याने आपल्या बंदूकीतून हवेत गोळीबार केला. त्याने नवीन गाडी घेतली. त्या आनंदात त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी औताडे यांच्या फिर्यादीनुसार पुष्कराज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक खरात अधिक तपास करत आहेत. संबंधित जवानाकडे बंदुकीचा परवाना आहे हा जवान मद्यधुंद असल्याचेही समजते हा प्रकार वादातून झाला की आनंदातून हे तपासाअंती स्पष्ट होईल.