Breaking News

डॉ.मुंडेंच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आंदोलन संपन्नपरळी : राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपंगांचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली सुमारे ३ ते ४ हजार अपंग आणि विधवांचे आरोग्य तपासणी करून विविध मागण्यांसाठी जागतिक अपंग दिनानिमित्त येथील तहसील कार्यलयावर आगळेवेगळे यशस्वी आंदोलन केले. त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करु  असे लेखी आश्वासन शासनाच्यावतीने देण्यात आले. जागतिक अपंग दिनानिमित्त सोमवारी ३ डिसेंबर रोजी अपंग आणि विधवांच्या प्रतिमाह एक हजार रुपये मानधनासाठी तसेच दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ आणि घरकूलासाठी परळी तहसील कार्यलयावर जमलेल्या सुमारे साडे ३ ते ४ हजारांच्या समुदायाने भव्य आंदोलन आले. दरम्यान त्याआधी जमलेल्या प्रत्येक अपंगाच्या कँसरसहित मोफत आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.