शिवसंग्राम पिंपरी-चिंचवड शहर संपर्क प्रमुखपदी पांडुरंग आवारे


बीड, (प्रतिनिधी): बीड येथे शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेच्या दि.१६ रोजी झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे आणि युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर.

यांनी बीड येथील पांडुरंग आभिमान आवारे-पाटील यांची पिंपरी-चिंचवड, पुणे शहर संपर्कप्रमुखपदी निवड केली आणि शुभेच्छा दिल्या. पांडुरंग आवारे यांना शिवसंग्रामच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात काम करण्याची संधी देऊन आमदार विनायक मेटे यांनी एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय दिला असून पांडुरंग आवारे यांना आपले नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.


गेल्या अनेक वर्षासापासुन शिवसंग्राममध्ये प्रामाणिकपणे व एक निष्ठेने काम करत असलेल्या पांडुरंग आवारे-पाटील यांनी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणुन समाजहिताच्या प्रश्नासाठी रस्ता-रोको, आदोलंने केली. उपोषणे केली व आपल्या संघटनेचा, पक्षाचा विस्तार करून आ.मेटे यांचे व शिवसंग्रामचे विचार बीड जिल्ह्यातच नाहीतर पिंपरी-चिंचवड,पुणे शहरामध्ये व अन्य ठिकाणी राज्यात समाजातील तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. त्यांची काम करण्याची धडपड, ईच्छाशक्ती, चिकाटी, जिद्द आपल्या पक्षा बद्दलचे प्रेम व एकनिष्ठपणा आणि पिंपरी-चिंचवड शहरामधला खूप मोठा जनसंपर्क पाहुण त्यांनी आज पर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणुन व पुढेही चांगले काम करतील असा विश्वास ठेऊन पांडुरंग आवारे-पाटील यांच्यावर आता पिंपरी-चिंचवड, पुणे शहर संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी व निवड करूण पुढे शहरात व जिल्ह्यात पक्ष कार्य वाढवण्यासाठी त्यांची आ.मेटे, शिवसंग्रामचे युवक प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर, बीड जिल्हाध्यक्ष यांनी त्यांची निवड केली आहे.
आमदार विनायक मेटे हे राज्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व असून शिवसंग्रामच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी समाजकारण आणि राजकारण केले आहे. हे करत असताना त्यांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी देऊन एका उंचीवर नेले आहे. पांडुरंग आवारे यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील जनसंपर्क, कामाचा अनुभव, शिवसंग्रामवरची निष्ठा, चळवळीतील योगदान या सर्व गुणांचा विचार करून आमदार विनायकराव मेटे यांनी त्यांना पुणे पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देऊन काम करण्याची संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
पांडुरंग आवारे यांच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात संघटनात्मक कामात वाढ होऊन शिवसंग्रामचा विचार तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.


Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget