Breaking News

जलयुक्त शिवारची कामे जलद गतीने पूर्ण करा मृद व जलसंधारणचे सचिव डवले यांच्या सूचना; जलयुक्त, रोहयो कामांचा आढावाजलयुक्त शिवारची कामे जलद गतीने पूर्ण करा मृद व जलसंधारणचे सचिव डवले यांच्या सूचना जलयुक्त, रोहयो कामांचा आढावाबुलडाणा,(प्रतिनिधी): जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भूजल पातळी वाढवण्यासाठी जल व मृद संधारणाची कामे करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सन 2017-18 मधील शिल्लक असलेली कामे येत्या 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी व सन 2018-19 मधील कामांना कार्यारंभ आदेश देऊन ती प्राधान्याने सुरू करावी.

 यंत्रणांनी समन्वयाने जलयुक्त शिवार अभियानातील कामे गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शनिवार, 15 डिसेंबर रोजी दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जलयुक्त शिवार, रोहयो कामे आदींबाबत आढावा बैठकीचे 15 डिसेंबर रोजी आयोजन केले होते.

त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने आदी उपस्थित होते. भारतीय जैन संघटना यावर्षी सुद्धा शासनासोबत गाळ मुक्त धरण अभियानात काम करणार असल्याचे सांगत सचिव डवले म्हणाले, की बीजेएससोबत सुरू होणारी कामे प्राधान्याने घ्यावीत.

 एरिया ट्रिटमेंट, गाळ काढणे आदींप्रमाणे कामांचा क्रम असावा, गतवर्षी बीजेएससोबत चांगल्या प्रकारे काम जिल्ह्यात झाले होते. यंदाही असेच काम अपेक्षित आहे. जिल्ह्यातील जलाशये, तलाव गाळमुक्त झाली पाहिजे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान पाच कामे सुरू करावीत. या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे.

त्यामुळे कामाची मागणी करणार्‍या प्रत्येकाच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. त्यानुसार रोहयो विभागाने शेल्फवरील कामांची संख्या पर्याप्त ठेवावी. जेणेकरून जास्त मागणी आल्यास कामे पुरवणे सुलभ होईल. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपजिल्हाधिकारी रमेश काळे यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, एसडीओ, जलसंधारण विभागाचे अधिकारी व संबंधित यंत्रणांचे कर्मचारी उपस्थित होते.