Breaking News

सय्यद सज्जाद यांना राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार जाहीर


पाटोदा (प्रतिनिधी)- राजे यशवंत होळकर यांच्या जयंती निमित्त जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने आयोजित सामाजिक व शैक्षणिक व साहित्यिक आदि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या समाजसेवकांना यशवंत रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येते. 

त्या अनुषंगाने सन २०१८ मध्ये सय्यद सज्जाद यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कमी वयात केलेले विविध उपक्रम व समाजिक क्षेत्रात काम करताना सामाजिक बांधिलकी जोपासणे शाहू फुले आंबडेकर विचाराशी निगडीत राहून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आण्यासाठी प्रोत्साहित करणे अर्धवट शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणा मार्फत स्वावलंबी जीवन जगण्यासाठी व तसेच त्यांची शैक्षणिक कार्यात छोटीशी धडपड व सामाजिक क्षेत्रात सर्व महापुरुषांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी अतोनात प्रयत्न अशा विविध सामाजिक कामात अग्रेसर राहून काम करणारे सय्यद सज्जाद यांचा प्रस्ताव पाहून पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र गाडेकर, प्रा. भगवान माने, अँड. राजू शिंदे, प्रा. चंद्रकांत भोंडवे यांनी निवड करून या पुरस्काराचे वितरण लवकरच यशवंत चव्हाण नाट्यगृह बीड येथे महारष्ट्रातील व बीड जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण व सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी सर्वांना कार्यक्रमाची पुढील तारीख कळविण्यात येईल.