Breaking News

सादोळ्यात दोन ठिकाणी चोरी; हजारोंचा ऐवज लंपास
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- एडस व इतर बहुतांश लैंगिक आजार केवळ व्यभिचारी प्रवृत्ती मुळे बळावत असल्याने नैतीक मूल्यांची, संस्कारांची जोपासना केल्यास हे सर्व आजार त्या व्यक्तीच्या आसपासही फटकत नाहीत असे प्रतिपादन इंडियन मेडीकल असोसिएशन चे अध्यक्ष तथा सुप्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ राजेश इंगोले यांनी केले. गंगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स नर्सिंग कॉलेजआणि इंडियन मेडिकल असोसिएशन च्या वतीने आयोजीत जागतीक एडस दिनानिमित्त आयोजीत जनाप्रबोधन रॅलीस संबोधीत करतांना ते बोलत होते. 

यावेळी संस्थेचे संचालक कार्यवाहक बलभीम शिंदे, प्राचार्या उषा केंद्रे, सचीव डॉ विजय लाड, सहासचिव डॉ उद्धव शिंदे, डॉ दत्तप्रकाश आवाड, डॉ रमेश लोमटे, डॉ विनोद जोशी यांच्या सह ईतर उपस्थीत होते. पुढे बोलतांना डॉ इंगोले यांनी एडस आजार कसा होतो, त्याची लक्षणे, निदान, उपचार पद्ध्ती यावर शास्त्रोक्त मार्गदर्शन केले. यावेळी डॉ लाड, डॉ शिंदे, डॉ लोमटे यांनी समायोचित मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यानी विविध ठिकाणी पथनाट्य, घोषणा आणी प्रबोधनात्मक संदेश वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक आचार्य सर तर आभार प्रदर्शन कार्यवाहक शिंदे यांनी केले.