Breaking News

पत्रकार महेंद्र मुधोळकर यांना शिवीगाळ करणार्‍यांवर कठोर कार्यवाही करा-एआयएसएफ


बीड (प्रतिनिधी)- ढत ९ या वृत्तवाहिनीचे पत्रकार महेंद्र मुधोळकर यांना एका अज्ञात व्यक्तीने भृमनध्वनिवरुन शिवीगाळ केली आहे. या घटनेचा ऑल इंडीया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असुन सदरील व्यक्ती विरोधात कठोर कार्यवाही करण्यात यावी नसता तिव्र आंदोलन करेल असा ईशारा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. 

महेंद्र मुधोळकर यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखांण्याबाबतचे वृत्त ढत ९ या वृत्तवाहिनीवर दिले होते. या कारणावरुन मुधोळकर यांना अज्ञात व्यक्तीने भृमनध्वनीवरून शिवीगाळ केली. होय हा तोच महेंद्र आहे, ज्याने वंजारी समाजातील अवधुत सातभाई ताडोळी तालुका परळी यांच्या मुलीचे कन्यादान करण्यासाठी महाराष्ट्र मदतीला धावून आणला होता. दारात लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, श्रीमंतीचा थाट-माट तसा नव्हताच, पण लग्नसोहळ्याला गरिबीचं का असेना, अनंदाचं कोंदन होत. अवधुत सातभाई यांचा दोन्ही मुलींचा लग्नसोहळा २९ डिसेंबर २०१५ होता. मात्र यात त्यांनी आत्महत्या केली अन् होत्याचे नव्हते झाले. महेंद्र मुधळकर या पत्रकारांने संपुर्ण महाराष्ट्राला आपल्या ढत ९ वरूण आवाहन केले आणी मदतीचा महापुर आला. आज याच महेंद्र यांना राजकीय नेत्यासाठी शिव्या घातल्या जातात याचा विचार करा? महेंद्रजी तुम्ही तुमचे कार्य असेच पुढेही चालु ठेवा एआयएसएफ तुमच्या सोबत आहे असे आवाहण रामहरी मोरे, दत्ता भोसले यांच्या सह अनेक पदाधिकारी यांनी केले आहे.