Breaking News

भगवानगड-बोधेगाव रस्त्याच्या कामासाठी 10 कोटी मंजूर - आ.राजळे


चापडगाव/प्रतिनिधी
गेल्या पंधरा वर्षापासुन रखडलेल्या आणि भगवानगड पंचक्रोशीतील गावांची विशेष मागणी असणारा भगवानगड, नागलवाडी गोळेगाव दिवटे ते बोधेगाव अशा सोळा किलोमीटर रस्ताला काल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन दहा कोटी तेहतीस लाख रूपये मंजुर झाले. महाराष्ट्र शासनाच्यावतीने यासंबंधीचा मंजूरी आदेश काढण्यात आला. हा रस्ता आ. मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नातुन आणि ग्रामविकासमंत्री मा.ना.पंकजा मुंडे यांच्या सहकार्याने मंजुर झाला असल्याने भगवानगड पंचक्रोशीतल्या गावांच्या सरपंचानी आ. राजळे यांचा सत्कार करून विशेष आभार मानले. 


या रस्त्याचे अंतर हे सोळा किलोमीटर असून भगवानगड पायथ्यापासून हा रस्ता नागलवाडी, गोळेगाव, दिवटे ते बोधेगाव राज्य महामार्ग याठिकाणी जोडला जाणार आहे. यामुळे भगवानगडावर जाण्याचे अंतर कमी होऊन भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे. यावेळी आ. राजळे म्हणाल्या की, भगवानगड हे आपल्या सर्वांचे मोठे श्रद्धास्थान आहे. पंकजा मुंडे यांनी विकासनिधी देताना शेवगाव-पाथर्डीला नेहमी झुकते माप दिल्यानं मतदारसंघासाठी आजवर कोट्यावधींचा निधी आणला आहे. यापुढे सुद्धा इतर गावांचे प्रलंबित रस्ताचे प्रश्‍न शासनाकडे पाठपुरावा करून लवकरचं सोडवले जातील. अशी ग्वाही यावेळी आ. राजळे यांनी दिली. यावेळी सरपंच संजय खेडकर, राजेंद्र डमाळे, बापुसाहेब भोसले, सुरेश नेमाने, रंगनाथ बटुळे, केशव आंधळे, भास्कर मासाळकर, भिसे पाटील यांच्यासह भगवानगड पंचक्रोशीतल्या गावच्या उपस्थित सरपंचानी आणि कार्यकर्तेनी आ. राजळे यांचे आभार मानले.