Breaking News

13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्या ः पवळेपारनेर/प्रतिनिधी
महाराष्ट्रात 13 कोटी वृक्षलागवडीच्या नावाखाली सरकारकडुन पुर्वनियोजित घोटाळा झाल्याचे जनतेला लक्षात येत आहे. महाराष्ट्रात 13 कोटी वृक्षलागवडीची मोठी जाहीरात मोठा खर्च करुन सरकारकडुन करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात 13 कोटी झाड निर्माण करण्यापासुन लावण्यापर्यंतचा खर्च मोठा आहे. 

आज एवढी झाडे लावण्याचा दिखावा याठिकाणी झाला परंतु प्रत्यक्षात झाड जगवण्यासाठी प्रशासणाच्या हलगर्जिपणामुळे जनतेचा पैसा या ठिकाणी पाण्यात गेला आहे. प्रत्यक्षात एवढी झाडे जगवता येत नसतील तर हा एवढा खर्च करण्यामागे पुर्वनियोजित घोटाळा असल्याचे लक्षात येत आहे. प्रशासनाने जबाबदारीने जनतेच्या पै-पैचा हिशोब जनतेला द्यावा.