Breaking News

सदगुरू चिले महाराज पालखी सोहळा 15 जानेवारीपासून
फलटण, (प्रतिनिधी) : श्री सदगुरू चिले महाराज यांचा पायी पालखी रथ सोहळा श्रीक्षेत्र जेऊर पैजारवाडी (जि. कोल्हापूर) ते श्रीदत्त मंदीर संस्थान श्री क्षेत्र मोर्वे ता.खंडाळा जि.सातारा असा होणार असून त्याचा प्रारंभ 15 जानेवारी पासून करण्यात येणार आहे.
श्री. चिले महाराज श्री क्षेत्र मोर्वे येथे प्रथम आले तो दिवस म्हणजे 26 जानेवारी या दिवशी सर्व भक्तगण आगमन दिन म्हणून साजरा करतात. त्यानिमित्ताने हा पालखी सोहळा साजरा केला जातो. यंदा या पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवार, दि. 15 जानेवारी रोजी श्री क्षेत्र जेऊर येथे श्रीभैरवनाथ व श्रीमसाई देवी यांना अभिषेक करून प्रस्थान व मुक्काम जेऊर येथे होईल.
दि. 16 रोजी श्रीक्षेत्र पैजारवाडीमार्गे सिध्देश्‍वर महराज मंदीर राजघाट कोल्हापुर येथे मुक्काम असेल. दि. 17 रोजी
सिध्देश्‍वर महाराज मंदिर येथून प्रस्थान व कोल्हापूर येथे श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक व त्र्यंबोली माता टेंबलाई मंदिर कोल्हापूर येथे मुक्काम होईल. दि.18 रोजी सकाळी टेंबलाई मंदिर येथून प्रस्थान व प्राथमिक शाळा येथे दुपारचा महाप्रसाद व हनुमान मंदिर वाठार येथे मुक्काम होईल. दि.19 रोजी श्रीदत्त मंदीर कामेरी येथे दुपारचा प्रसाद व त्यानंतर पेठ नाका येथे मुक्काम होईल. दि.20 रोजी श्री नवानाथ मंदीर वाठार येथे दुपारचा महाप्रसाद कराड नगर परीषद येथे मुक्काम करण्यात येईल. दि.21 रोजी वराडे येथे नर्सरी फार्म येथे दुपारचा महाप्रसाद त्यांनतर गांधीनगर काशीळ श्री दत्त मंदीर येथे मुक्कामाची व्यवस्था होईल. दि. 22 रोजी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना येथे दुपारचा महाप्रसाद व तेथून पोलीस करमणुक केंद्र, जिल्हा तालीम संघ सातारा येथे मुक्काम होईल. दि. 23 रोजी लिंब फाटा येथे दुपारचा महाप्रसाद व तेथून मराठी शाळा उडतारे येथे मुक्काम करण्यात येईल. दि. 24 रोजी कृष्णाई मातेच्या श्रींच्या पादुकांना स्नान व भुईजमध्ये भव्य मिरवणुक सुरूर फाटा येथे दुपारचा महाप्रसाद राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे मुक्काम दि.25 रोजी बाळसिध्दनाथ मंदीर म्हावशी येथे दुपारचा महाप्रसाद श्री कळभैरवनाथ अहीरे येथे मुक्काम दि.26 रोजी अहीरे येथुन पालखी रथ सोहळा मिरवणुक श्री क्षेत्र दत्त मंदीर मोर्वे येथे मुक्काम होईल.
(कै.) हरीभाऊ आनंदराव चव्हाण माजी अध्यक्ष श्री दत्त मंदीर मोर्वे यांच्या स्मरणार्थ दि. 26 जानेवारी रोजी भव्य ढोल लेझिम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भक्तांनी या पायी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीदत्त मंदीर संस्थान मोर्वे ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.