पोलिसांच्या गाडीला अपघात, 16 जखमी चौघांची प्रकृती गंभीर; नाशिकला हलविलेकळवण/ प्रतिनिधीः
नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयातून कळवण येथे बंदोबस्तासाठी जाणार्‍या पोलिसांच्या वाहनाला आठंबे शिवारात अपघात होऊन 16 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी चार पोलिस कर्मचार्‍यांना डोक्याला व हातापायाला दुखापत झाली. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

नवीन वर्षाचे स्वागत व कोरेगाव भीमा प्रकरणी कळवण येथे बंदोबस्तासाठी नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयातून वाहन क्रमांक एमएच 15 ए ए 3067 मधून चालक व 15 कर्मचारी एकूण सोळा कर्मचारी येत होते. या वाहनाला आठंबे शिवारात दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास गाडी पलटी होऊन अपघातात 16 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पैकी चार पोलिस कर्मचार्‍यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील खासगी अपोलो रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती कळवण येथील सीए गालिब मिर्झा यांनी भ्रमणध्वनीवरून अभोणा येथील पोलिस कर्मचारी बबनराव पाटोळे यांना दिली. पाटोळे यांनी ही माहिती तात्काळ कळवण पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना दिली. त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधत रुग्णवाहिका व मिळेल त्या खासगी वाहनांनी सर्व जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यापैकी पाच जण अमरसिंग छोटूसिंग हजारी (वय 56), चंद्रकांत शंकर माळी (वय 53), निंबाजी सोमा जगताप (वय 56), काशिनाथ एकनाथ पवार (वय 43), किशोर वामन भांगरे (वय 40) यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. 

कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी पोलिसांची नावे पुढीलप्रमाणे - दशरथ परशराम बोरसे (वय 48), भास्कर माधवराव देशमुख (वय 49), चैतन्य बालाजी सपकाळे (वय 53), दत्तू बालाजी सानप (वय 54), मनोहर पांडुरंग केदारे (वय 54), बाळू काशिनाथ लोंढे (वय 52), बाळासाहेब निवृत्ती शिंदे (वय 40), राजूकचरू वाघ (वय 53), रमेश सखाराम चौधरी (वय 54), अनिल सजन कोकाटे (वय 50), अनिकेत सुनिल मोरे (वय 26) आदी आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget