Breaking News

अखेर राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांना शो-कॉज नोटीसा

अहमदनगर/प्रतिनिधी
पक्षाचा आदेश नसतांना धाब्यावर बसवून राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पक्षाकडून सर्व नगरसेवकांना शो-कॉज (कारणे दाखवा नोटिस) बजावण्यात आली आहे. ही नोटीस पोष्टाने प्राप्त झाली असून त्यावर नगरसेवक काय उत्तरे देतात आणि पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
मनपाच्या महापौर निवडणुकीत शिवसेना व भाजपा या जातीयवादी पक्षांशी युती करायची नाही. असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते. मात्र, त्या आदेशाची पायमल्ली करुन आ. संग्राम जगताप यांनी वैयक्तीक पातळीवर निर्णय घेऊन भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यात खळबळ उडली होती. तर राजकीय पक्षांनी राष्ट्रवादी पक्षावर चिखलफेक झाली होती. मात्र, स्वत: शरद पवार यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना खुलासा केला. ही युती आम्हाला मान्य नाही. हा परस्पर निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर पक्ष कडक कारवाई करेल. सद्या सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. त्यांची उत्तरे काय येतात यावर पुढील निर्णय 5 जानेवारी रोजी घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते. सद्या कायदेशीररित्या 18 नगरसेवकांना ही नोटिस बजावण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या व नगरसेवकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर तसेच शहरात 300 कोटी रुपये आणून विकास करण्याच्या हेतूने युती केल्याचा कांगावा आ. जगताप पुत्राने केला आहे. मात्र, वास्तवात नोटीसला कायदेशीर काय उत्तर देतात. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
चौकट
काय आहे नोटीसमधील मजकूर
मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीने समविचारी पक्षाशी आघाडी करुन लढण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान दि.28 डिसेंबर रोजी महापौर निवडीत शिवसेना किंवा भाजपला मतदान करु नये असा आदेश दिला होता. मात्र, तो डावलून भाजपला पाठींबा देऊन मतदान करण्यात आले. त्यामुळे पक्षाच्या आदेशाचा भंग झाला आहे. पक्षादेशाचे पालन न केल्यामुळे आपल्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये. याबाबत सात दिवसांच्या आत पक्षाध्यक्षांना खुलासा करावा. असे न झाल्यास आपल्याला काही सांगायचे नाही. असे समजून कारावाई करण्यात येईल.