Breaking News

आयसीसीच्या महिला टी-20 संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौर


नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून (आयसीसी) 2018 च्या सर्वोत्तम टी-20 आणि एकदिवसीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये टी-20 संघाचे नेतृत्व भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. तर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हे न्यूझीलंडच्या सुझी बेट्सकडे सोपवण्यात आले आहे. आयसीसीने सोमवारी हे दोन्ही संघ जाहीर केले आहेत. हरमनप्रीतने 2018 या वर्षात 25 टी-20 सामने खेळताना 126.2 च्या सरासरीने 663 धावा आपल्या नावावर केल्या आहेत. आयसीसी महिला टी-20 क्रमवारीत हरमनप्रीत सध्या तिसर्‍या स्थानावर आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वात खेळणार्‍या भारतीय महिला संघाने 2018 ला झालेल्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती.


आयसीसीची टी-20 महिला संघ
स्मृती मंधना (भारत), एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), सुझी बेट्स (न्यूझीलंड), हरमनप्रीत कौर (कर्णधार, भारत), नटाली स्किव्हर (इंग्लंड), एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया), ऍशलेघ गार्डनर (ऑस्ट्रेलिया), लिघ केसपेरेक (न्यूझीलंड), मगन स्कूट(ऑस्ट्रेलिया), रुमाना अहमद (बांगलादेश), पूनम यादव (भारत)


एकदिवसीय संघ
स्मृती मंधना (भारत), टॅमी बेमाऊंट (इंग्लंड), सुझी बेट्स (कर्णधार, न्यूझीलंड), डेन वॅन निकर्क (दक्षिण आफ्रिका), सोफी डेव्हाईन (न्यूझीलंड), एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), मरीझेन कॅप (दक्षिण आफ्रिका), डिनद्रा डॉटीन (वेस्ट इंडिज), सना मीर (पाकिस्तान), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), पूनम यादव (भारत)