Breaking News

हिंदी अध्यापक मंडळाची 22 रोजी नियोजन सभा


सातारा (प्रतिनिधी) : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा वार्षिक कार्यक्रम बुधवार दि.23 रोजी जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मंगळवार दि.22 रोजी दुपारी एक वाजता राष्ट्रभाषा भवन, सातारा येथे मंडळाचे अध्यक्ष ता. का. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची नियोजन सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.