Breaking News

औंध येथे 25 रोजी राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे आयोजन


औंध (प्रतिनिधी) : येथील परमपूज्य ब्रम्हलीन हिरापुरी महाराज यांच्या 48 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवार, दि 25 रोजी राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक शामपुरी महाराज यांनी दिली.

हिरापुरी महाराज यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दरवर्षी शामपुरी महाराज यांच्या वतीने भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यंदा या स्पर्धेचे 19 वे वर्ष आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता हिरापुरी महाराज यांच्या पादुकांना रुद्राभिषेक व मंत्रपुष्पांजली तसेच राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे उदघाटन मठाधिपती सुंदरगिरी महाराज, रामलिंग महाराज, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, आ. मोहनराव कदम, हरणाई उद्योग समुहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, सरपंच सौ नंदिनी इंगळे, उपसरपंच सचिन शिंदे, आचार्य शिवानंद भारती यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

पुरुष आणि महिला गटात ही स्पर्धा होणार आहे. विजेत्या चार स्पर्धकांना अनुक्रमे 11 हजार, 7 हजार, पाच हजार, तीन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच शनिवारी 26 रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, नामदेवराव ननावरे, कार्यकारी अभियंता प्रतापराव कदम, ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या हस्ते होणार आहे.