देशसेवेची 272 जवानांनी घेतली शपथ ; जवान देशाचे नाव उज्जवल करतील ; मेजर जनरल नवनीत कुमार यांचा वि÷श्‍वास


अहमदनगर : भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटर अर्थात एमआयआरसीत कठीण परिश्रम व कठोर मेहनतीच्या आधारे 36 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्यात प्रवेश करण्या साठी तयार झालेल्या जवानांच्या 421 व्या तुकडीतील 272 सैनिकांनी शानदार समारंभात देशसेवेची शपथ घेतली. 
भारतीय लष्कराच्या दक्षिण महाराष्ट्र एरियाचे जीओसी मेजर जनरल नवनीत कुमार यांनी या शानदार परेडचे निरीक्षण केले. मेजर जनरल नवनीत कुमार यांनी दीक्षांत परेडची मानवंदना स्वीकारली. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व शपथग्रहण करणार्या सैनिकांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर मध्ये असलेल्या भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंट सेंटर अर्थात एमआयआरसी तील अखौरा ड्रील मैदानावर आयोजित दीक्षांत समारंभात प्रशिक्षण पूर्ण करणार्या 421 व्या तुकडी तील 272 जवानांनी शानदार परेड करून मेजर जनरल नवनीत कुमार यांना मानवंदना दिली. लष्करी प्रथेनुसार विविध धर्म गुरूंनी परेड मैदानात आणलेल्या भगवत गीता,गुरूग्रंथ साहिब,कुराण शरीफ,बायबल सारख्या आपापल्या पवित्र धर्मग्रंथां वर हात ठेवून देशसेवेची शपथ घेतली.परेड अ‍ॅडज्युटंट यांनी या रिक्रुट जवानांना देशाचे संविधान व देश संरक्षणासाठी इमानदारी,निष्ठा व कठीण स्थितीत आपली जबाबदारी पूर्ण करण्याची शपथ दिली.मेजर जनरल नवनीत कुमार यांच्या हस्ते 421 व्या तुकडीतील सर्वोत्कृष्ट रिक्रुट साठीचे जनरल सुंदरजी सुवर्ण पदक रिक्रुट गोपाल सिंग याला, जनरल डिसुजा रजत पदक रिक्रुट अखिल कृष्णन याला व रिक्रुट प्रतीक ला जनरल पंकज जोशी कांस्य पदक देऊन गौैरविण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget