Breaking News

संतप्त शेतकर्‍याने फेकला 30 क्विंंटल कांदा रस्त्यावर


वैजापूर/ प्रतिनिधीः
कांद्याला भाव कमी मिळाल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकर्‍याने तब्बल 30 क्विंटल कांदा रस्त्यावरच फेकून दिला. दुपारच्या सुमारास शहरात हा प्रकार घडला. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या आपल्या मालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हताश झाला आहे.

वैजापूर तालुक्यातील चांडगाव येथील शेतकरी प्रमोद गायकवाड हे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. लिलावात या कांद्याची 52 रुपये प्रतिक्विंटल बोली लावली गेली. त्यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी सरळ शहरात येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हा कांदा रस्त्यावर फेकून दिला. 
वाहतूक खर्च 1400 रुपये अन् कांद्याला 52 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून आपण हा कांदा रस्त्यावर फेकून दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात कांदा रस्त्यावर फेकून दिल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.