Breaking News

पुसेगावच्या बैल बाजारात 30 हजारे जनावरे दाखल


सातारा (प्रतिनिधी) : श्री सेवागिरी महारांजाच्या वार्षिक यात्रेनिमित्त येथे भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकतून सुमारे 30 हजार जातीवंत खिलार जनावरे दाखल झाली असून, जनावरांच्या बाजारात खरेदी- विक्री व्यवहार तेजीत सुरु आहेत. या बाजारात अजूनही जनावरे दाखल होत असून, या वर्षी खरेदी - विक्री व्यवहार उच्चांकी होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. 

पुसेगाव (ता. खटाव) येथील जातीवंत खिलार जनावरांचा बाजार महाराष्ट्रासह इतर राज्यातही चांगलाच प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक या भागातून खिल्लार जनावरे दाखल झाली आहेत. यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, बारामती, खरसुंडी तसेच विविध जिल्हा राज्यातून शेतकरी व व्यापार्‍यांनी आपले खिलार बैल, खोंड तसेच गायही विक्रीसीठी आणले आहेत. या बैल बाजारात जातिवंत बैलांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. कर्नाटकासह पंढरपूर, सांगली, सोलापूर, पुणे, सातारा जिल्हातील तसेच कोकण भागातील शेतकरी बैलांची खरेदी करताना दिसत आहेत.जातिवंत खरेदी करताना दिसत आहेत. जातिवंत खिलार बैलाच्या किंमती 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहेत. प्रदर्शनातील खिलार बैलांच्या किंमती 50 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत असून, या बैलांच्यासाठी शेतकरी व व्यापार्‍यांनी खास मंडप घातलेले आहेत. लहान खोंडाची किंमत सरासरी दहा हजारांपासून 50 हजारांपर्यंत असल्याचे बोलेले जात आहे. तसेच शेतीकामांसाठीही शेतकरी बडीव बेलांच्या खरेदीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. मोठ्या बैलांच्या किमती 4 हजार रुपयांपासून 1 लाख 50 हजारापर्यंत आहेत. तर जातिवंत जनावरांची पैदास करणार्‍या वळू बैलांची किंमत सव्वा लाखाच्या आसपास आहेत. काही शेतकर्‍यांनी जातिवंत जनावरांची पैदस करणारे बैल या प्रदर्शनात बांधले आहेत. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांना त्यांच्या गायींपासून खिलार जनावरांची पैदास करावयाची आहे. त्यांच्यासाठी खास सोय झाली आहे. पशुधन संवर्धन स्पर्धेसाठी बैलांची आकर्षण सजावट या प्रदर्शनात आपला खोंड व बैल आकर्षक दिसावा या याकरिता शेतकरी आणि व्यापारी रंगीत सुती व नायलान कासरा, दोरखंड, वेसण, शिंब्या झुल खरेदी साठी दुकानात गर्दी केलेली दिसत आहे. जातिवंत खिलार बैल, खोंडाची शिंगे सवळून घेउन शिंगाना वेगवेगळे रंग दिले आहेत. या यात्रेतील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व पुसेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बैलबाजारात विविध ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ काढून पाण्याही कायमस्वरुपी सोय केलेली आहे.