Breaking News

श्री खंडोबा यात्रेनिमित्त कलम 36 लागू


सातारा (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र पाल (ता. कराड) येथे श्रीखंडोबा देवाची वार्षिक यात्रा 16 ते 23 जानेवारी या कालावधीत साजरी होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी प्रथा परंपरेनुसार रथोत्सव मिरवणुक काढण्यात येते. 

या कालावधीदरम्यान आयोजित होणार्‍या विविध कार्यक्रम, मिरवणुका या संबंधाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे आणि ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे यासाठी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार, कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना दि. 16 ते 23 जानेवारी या कालावधीकरीता त्या- त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून व सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे, यादृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.