Breaking News

ऑगस्टा वेस्टलँडकडून 432 कोटींची लाच सीबीआयचा दावा; भारतीयांना लाच दिल्याचे पुरावे उपलब्धनवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणात लाच स्वीकारलेल्या भारतीयांना अटक होण्याची शक्यता आहे. लाच प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. ख्रिश्‍चन मिशेलआणि गुइडो हाश्के यांनी भारतात तब्बल 432 कोटी रुपये लाच म्हणून दिली असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिशेल आणि हाश्के यांनी 8 मे 2011 रोजी दुबईत केलेल्या करारात 58 मिलियन युरो रक्कमेचा उल्लेख होता. दुबईतील ही बैठक दोघांकडून दलालांमध्ये किती रक्कमेचे वाटप करायचे यासाठी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मिशेल आणि त्याचे सहकारी व हाश्के, कार्लो गेरोसा आणि त्यागी बंधू सहभागी होते.

दुबईत झालेला करार महत्त्वाचा पुरावा ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन मध्यस्थांमध्ये रक्कम वाटपाबाबतची डील यामध्ये आहे. 22 मिलियन युरो ’कुटुंबा’साठी आणि 32 मिलियन युरो ’टीम’साठी वाटण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सीबीआयनुसार, हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी आणि त्यांचे नातेवाईक असलेले संदीप, संजीव आणि राजीव त्यागींना 10.5 मिलियन युरो देण्यात येणार होते. त्यातील 3 मिलियन युरो त्यांना देण्यात आले.