Breaking News

एटीएम कार्डचा पीन नंबर विचारून पाटणला 50 हजारांची फसवणूकपाटण (प्रतिनिधी) : स्टेट बँकेची आधिकारी असल्याचे सांगून फोनवरून क्रेडिटकार्ड आणि एटीएम कार्डचे पासवर्ड नंबर विचारून घेत 50 हजार रुपये काढून फसवणूक झाल्याची फिर्याद पाटण पोलीसांत दाखल झाली आहे .


याबाबत पाटण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली एकनाथ पवार (रा. दत्त कॉलनी, पाटण) यांना 29 डिसेंबर रोजी मोबाईलवर एक फोन आला. त्याद्वारे समोरील महिलेने, मी स्टेट बँकेतून बोलत आहे. तुमच्या क्रेडिट आणी एटीएम कार्डचे पासवर्ड पिन नंबरची मागणी केली. तुमची कार्ड व्यवस्थित चालतात का? ते आम्हाला तपासणी करायचे आहे, कारण तुम्हाला आम्ही एक स्कीम देणार आहोत. त्यावर तुम्हाला तीन हजार रुपयांचे गिफ्ट व्हौचर मिळणार आहे, असे सांगितले. त्यावेळी वैशाली पवार यांनी निनावी व अनोळखी फोनवर पीन नंबरचा तपशील दिल्यावर काही वेळातच त्यांच्या बचत खात्यातील 10 हजार रूपये एटीएमद्वारे काढण्यात आले तर क्रेडिट कार्डमधून 40 हजार रुपये काढल्याचे त्यांचा निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी तातडीने पाटण पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दाखल केली. याप्रकरणी हवालदार रवींद्र कचरे व सहकारी अधिक तपास करत आहेत.