जनतेच्या न्यायालयातून चौकीदाराचा पळ; राहुल गांधी यांची मोदी यांच्यावर टीका; 56 इंचीवाले लोकसभेत अबोल


जयपूर - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राफेल, सवर्णांना आरक्षण विधेयक आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर सभागृहात गंभीर चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका सुरू केली आहे. 

राजस्थानमधील जयपूर येथे एका सभेदरम्यान राफेलवरून राहुल यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की 56 इंचाची छाती असणारे पंतप्रधान लोकसभेत एक मिनिटही येऊ शकले नाहीत. इतकेच काय त्यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांना सभागृहात आपल्या संरक्षणासाठी पाठवले. अशा पद्धतीने जनतेच्या न्यायालयातून चौकीदाराने पळ काढला. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर राजस्थानमध्ये बोलताना राहुल उत्साहात दिसले. त्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून आपल्या पक्षाचे कौतुक करताना मोदी सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. देशातील शेतकरी आणि युवकांनी ‘बॅकफूट’वर येऊन बॅटिंग करू नये. उलट त्यांनी ‘फ्रंटफूट’वर येऊन षटकार मारावा, असा सल्ला दिला.

राहुल म्हणाले, की मोदी सरकारने रात्री अंधारात सीबीआयच्या संचालकांना हटवले. केंद्र सरकारला झटका देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा पदावर बसवले. राफेल प्रकरणाची संयुक्त संसदीय चिकित्सा समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोटे दुकानदार नष्ट झाले. बँकेचा सारा पैसा अनिल अंबानी आणि त्यांच्या मित्रांना दिला. युवक, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांना किती पैसे दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget