Breaking News

बस अपघातात 6 शाळकरी विद्यार्थी ठार


गडचिरोली : एटापल्ली नजीकच्या गुरुपल्ली येथे लोहखनिज वाहतूक करणार्‍या ट्रकने परिवहन महामंडळाच्या बसला जबर धडक दिल्याने 6 जण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी 4 ट्रक पेटवून दिले. मृतकांमध्ये शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश असून, अनेक जण जखमी झाले आहेत. अहेरी वनविभागात कार्यरत क्षेत्रसहायक प्रकाश अंबादे हेही या अपघातात ठार झाल्याची माहिती आहे.

बुधवारा सकाळी एमएच 40- एक्यू-6034 क्रमांकाची परिवहन महामंडळाची बस विद्यार्थी व अन्य प्रवाशांना घेऊन एटापल्ली येथून आलापल्लीकडे जाण्यास निघाली. गुरुपल्ली गावाजवळ बस पोहचताच समोरुन येणार्‍या एमएच 31 सीक्यू 3386 क्रमांकाच्या ट्रकने बसला जबर धडक दिली. यात 6 जण जागीच ठार झाले. त्यात 3 शाळकरी विद्यार्थिनींचाही समावेश आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून, त्यांना अहेरी व चंद्रपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी असल्याने मृतकांचा संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी 15 ट्रक पेटवून दिले, तर सुरजागड पहाडाकडे लोहखनिज आणण्यासाठी जाणार्‍या अन्य ट्रकची वाहतूक अडवून धरली.