Breaking News

चंदेरी दुनियेत झळकण्यासाठी 75 तरुण-तरुणींची आर्थिक फसवणूकमुंबई : बॉलिवुडमध्ये करिअर करण्यासाठी देशातील अनेक तरूण-तरूणी मुंबईच्या चंदेरी दुनियेत झळकण्याचा प्रयत्न करत असतात. मुंबई ही स्वप्न नगरी आहे. तरुणांना बॉलिवुडचे आकर्षण आहे. अशीच एक घटना मुंबईत घडली असून, हिंदी चित्रपट किंवा टीव्ही मालिकेत काम देण्याच्या बहाण्याने 75 जणांची आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबई क्राईम ब्रँचने या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून, यातील दोन आरोपींनी ताब्यात घेण्यात आले आहे.
चित्रपट आणि टीव्ही मालिकेमध्ये काम देण्याच्या नावाखाली 75 तरुण तरुणींना फसविले आहे. या दोन आरोपींपैकी एक जण सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तर दुसरा मडकी बनविण्याचे काम करतो. सध्या सुरू असलेल्या ‘कृष्णा चली लंडन’ या टीव्ही मालिकेमध्ये काम देण्याच्या नावाखाली या दोघांनी 75 जणांना फसविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सोशल मीडियाचा वापर करून प्रमुख आरोपी अविनाश शर्मा (सॉफ्टवेअर इंजिनिअर) याने सुरवातीला फेसबुकवरील ऑडिशन इंडिया या वेबसाईटच्या आधारे सिरीयलमध्ये कलाकारांची गरज आहे हे जाणून घेतले. त्या वेबसाईटवर ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांनी माहिती द्यावी. या वेबसाईटवरील संपर्क नंबर किंवा इ-मेल पत्यावर घेऊन स्वतःला टीव्ही सिरीयल निर्माते भासविले. लोकांना सिरीयलमध्ये काम देण्याचा आमिष दाखविले. त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार पर्यंतची रक्कम घेतली. एखाद्या युवकाने पैसे दिल्यानंतर हे आरोपी स्वतःचा मेल आयडी आणि इतर संपर्क क्रमांक बंद करून दुसर्‍या मेल आयडी व मोबाईल क्रमांकावर नवीन इच्छुक शोधायचे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहिती प्रमाणे आता पर्यंत या दोघांनी जवळपास 70 ते 75 लोकांना फासविले आहे. ज्यामध्ये मुंबई महाराष्ट्रसोबत देशाच्या इतर भागातून आलेल्या तरुण मंडळींचा ही समावेश आहे. अटक आरोपीमध्ये प्रमुख आरोपी शर्मा हा साफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याने त्याचा सहकारी आरोपी विनोद भंडारी याला पैशाचे आमिष देऊन सोबत जोडले होते. दोन्ही आरोपींना 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.