Breaking News

लडाखमध्ये हिमस्खलन; तिघांचा मृत्यू, 7 जण बेपत्ताश्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील लडाख येथे खारदुंग जवळ झालेल्या हिमस्खलनात 10 जण बेपत्ता झाले होते. यातील तिघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप 7 जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. ट्रकमधून 10 जण प्रवास करत होते; मात्र हिमस्खलन झाल्यानंतर ट्रक बर्फाखाली गेला आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. घटनास्थळी लष्कर आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे. बर्फाखाली गेलेल्या ट्रकमधील सर्वजण स्थानिक नागरिक आहेत, की सुरक्षा दलाचे जवान, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या ठिकाणी उणे 15 अंश सेल्सियस तापमान असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.