Breaking News

एनआयचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये 7 ठिकाणी छापे


नवी दिल्ली : घातपाती कारवाया प्रकरणी अटक केलेल्या इसिसच्या संशयितांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने उत्तर प्रदेशातील पश्‍चिम भागात आणि पंजाबमध्ये 7 ठिकाणे छापे टाकले आहेत. याआधी एनआयने उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील 17 ठिकाणी छापे टाकून घातपाताचा मोठा कट उधळला होता. 

या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटके, शस्त्रास्त्रे, देशी बनावटीची रॉकेट लाँचर तसेच आत्मघाती हल्ले करण्यासाठीची वापरली जाणारी सामुग्री जप्त करण्यात आली आहेत. या छाप्यात दहशतवादी संघटना इसिसच्या 10 संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोघांना अटक केली होती. इसिसच्या ’हरकत उल हर्ब ए इस्लाम’ हा नव्या गटाचा देशातील गर्दीच्या ठिकाणी घातपात घडविण्याचा आणि अतिमहनीय व्यक्ती आणि राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट होता, असे तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यासाठी त्यांच्या कारवाया रोखण्यासाठी एनआयएकडून कारवाई सुरू आहे.