दोन गटांच्या वादातून 9 दुचाकी जाळल्या; कुंभारवाडी येथील घटना, आश्‍वी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल


संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी गावात पळून जावून विवाह केलेल्या चुलत बहिणीला जत्रेसाठी बोलविल्याने दोन गटात झालेल्या वादातून नऊ मोटारसायकली पेटवून देण्यात आल्या आहेत. हि घटना सोमवार दि.14 रोजी सकाळी घडली. या प्रकरणी आश्‍वी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन तक्रारीवरून चौदा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कुंभारवाडी येथे यात्रात्सोवासाठी राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथील अरूण वारे हे पत्नीसह आले होते. यावेळी त्याच्या पत्नीचा चुलत भाऊ नामदेव काशिनाथ केदार याने वारे याची सासु फुलाबाई यांना मुलगी जावई या दोघांना यात्रेसाठी का बोलावले? अशी विचारणा करत त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर वारे याने त्याच्या नातेवाईकांना तेथे बोलावून घेतल्यानंतर दोन गटात वाद होवून हाणामारी झाली. यावेळी वारे याचे नातेवाईक घेवून आलेल्या मोटारसायकली तेथेच सोडून पळून गेले. त्यानंतर नामदेव केदार आणि इतरांनी त्या नऊ मोटारसायकली पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. या प्रकरणी आश्‍वी पोलीस ठाण्यात अरूण महादू वारे आणि नामदेव काशिनाथ केदार या दोघांनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget