गुजरातमध्ये तीन चकमकी बनावट; तपास समितीच्या अहवालातून स्पष्ट ; 9 पोलिस अधिकार्‍यांवर आरोप निश्‍चित


नवी दिल्ली : गुजरात राज्यात 2002 ते 2006 या चार वर्षाच्या काळात झालेल्या तीन चकमकी बनावट होत्या, असे तपास समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी 9 पोलिस अधिकार्‍यांवर आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. 

जस्टिस एच.एस. बेदी यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने या दरम्यान झालेल्या 17 प्रकरणांचा तपास केला. तसेच आपला अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करताना त्यापैकी 3 बनावट होते असे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करताना त्यांनी समीर खान, कासम जाफर आणि हाजी इस्माईल या तिघांच्या एनकाउंटरचा उल्लेख केला आहे. समितीने आपल्या अहवालात या प्रकरणांमध्ये गुजरातच्या 9 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या विरोधात आरोप निश्‍चित केले आहेत. गुजरातमध्ये 2002 ते 2006 दरम्यान झालेले अनेक एनकाउंटर वादग्रस्त ठरले. त्यापैकी 17 सर्वात कुप्रसिद्ध एनकाउंटरच्या चौकशीची जबाबदारी एका न्यायालयीन समितीकडे सोपविण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बेदी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आपला अंतिम अहवाल गतवर्षी फेब्रवारी महिन्यात सुप्रीम कोर्टात सादर केला. आता यातील 9 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवर आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. या प्रकरणात काही आयपीएस अधिकार्‍यांवर सुद्धा आरोप झाले होते. परंतु, समितीने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली नाही. यासंदर्भात 9 जानेवारी रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुजरात सरकारची याचिका फेटाळून लावली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget