Breaking News

कबडड्ी खेळामध्ये सातत्य असणे काळाची गरज
खामगांव,(प्रतिनिधी): कबडड्ी हा मैदानी आणि मर्दानी खेळ असुन हा खेळ जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने कबडड्ी स्पर्धा आयोजित करणे ही काळाची गरज बनली आहे. भारतभर अनेक मोठया कबडड्ी स्पर्धा आयोजित केल्या जात आहे. प्रो कबडड्ी, खेलो इंडिया सारख्या स्पर्धांच्या माध्ममातून कबडड्ी खेळाडुंना आपले उज्वल भविष्य घडविण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.

 खेळाडुंनी खिळाडु वृत्ती अंगी बाळगुन, सातत्याने सराव करुन उत्कृश्ट खेळाचे प्रदर्शन  करुन आपल्या गावाचा व शहराचा नावलौकीक वाढवावा असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. खामगांव तालुक्यातील कवडगांव येथे जय सेवालाल मित्र मंडळाच्या वतीने दि.27 व 28 डिसेंबर रोजी ग्रामीण भागाकरीता दणदणीत सामन्यांचे आयोजन  करण्यात आले होते. या  स्पर्धेला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी भेट दिली त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर,अजय तायडे,काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष बबलु पठान, राजेश जोशी, माजी पं.स.सदस्य श्रीराम तिवाले, फुलसिंग चव्हाण, महारु राठोड, सारंगधर राठोड, सांडु रामदास, आनंद शिंगणे, राजु दिक्षीत, भाईदास चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीपकुमार सानंदा व मान्यवरांचे आगमन झाले असता संत सेवालाल मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देउन स्वागत करण्यात आले.

माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वतीने स्पर्धेचे प्रथम पारीतोषीक 15 हजार रुपये ,जय सेवालाल पंच मंडळ कवडगांवच्या वतीने द्वितीय बक्षीस 11 हजार रुपये, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर यांच्या वतीने स्पर्धेचे तृतीय बक्षीस 5 हजार , फुलसिंग चव्हाण यांच्या वतीने 2001 रुपयाचे चतुर्थ बक्षीस ठेवण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकुण 27 संघांनी सहभाग घेतला.स्पर्धेचा अंतीम सामना स्टार कबडड्ी संघ बाभुळगांव विरुध्द जय मल्हार कबडड्ी संघ हिवरखेड यांच्या संघादरम्यान खेळला गेला. या सामन्यामध्ये स्टार कबडड्ी संघ बाभुळगांव हा विजेता तर जय मल्हार कबडड्ी संघ हिवरखेड हा उपविजेता ठरला.स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे बक्षीस नाईकनगर कबडड्ी संघ धाबा,चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस जय सेवालाल कबडड्ी संघ धोत्रा या विजेत्या संघांना  माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर यांच्या हस्ते  बक्षीसांचे वितरण करण्यात आले.स्पर्धेचे पंच म्हणुन रामराव पवार, हरिदास राठोड, ताराचंद राठोड, रविंद्र राठोड, तुकाराम पवार, सुधाकर पवार, रमेश पवार यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी करण्याकरीता जय सेवालाल मित्र मंडळ कवडगांवच्या पदाधिकारी व  कार्यकर्ते तसेच समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.